जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | १३ मे रोजी लोकसभेच्या निवडणूकीची चौथ्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पाडली. निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना दोन निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हे दोघेही जळगाव जिल्ह्यातील आहेत.
जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात सोमवार 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा प्रशासनाकडून मतदानाच्या तयारीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या तयारी दरम्यान नियुक्त महापालिकेचा क्लार्क आणि होमगार्ड अशा दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मयत कर्मचाऱ्यांना शासनाची भरपाई मिळावी या संदर्भात अहवाल पाठवण्यात येणार असल्याच यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले.