रावेर (प्रतिनिधी)। रसलपुर येथील झालेल्या घटने संदर्भात दोन गुन्हात रावेर पोलिसांनी एकुण सतरा जणांना अटक केली आहे. बेकायदेशीररित्या गोमांस वाहतुक केल्या प्रकरणी टाटा मँजिकच्या मालक व चालकासह सहा जणांना दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. याबाबत माहिती अशी की, गुरुवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास टाटा मॅजिक गाडी क्रमांक (एमपी 68 पी 0137) मध्ये बेकायदेशीर गोमांस वाहतूक केल्या प्रकरणात रावेर पोलिसांनी ड्रायव्हर शेख वसीम शेख इस्माईल (रा. मदिना कॉलनी) गाडी मालक शे जमिल शे अय्युब रसलपूर, शे हुसेन शे हसन रसलपूर,शे अफसर शे हसन, शे शकील शे नुरा रसलपूर या सहा आरोपींना अटक केली आहे. या 6 आरोपींना रावेर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने 6 जणांना 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
11 जणांना न्यायालयीन कोठडी
रसलपुर येथे गोमांस घेवून जाणाऱ्या टाटा मँजिक गाडी जाळल्या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी स्वप्निल महाजन, प्रल्हाद संतोष महाजन, योगेश संतोष महाजन, रविंद्र वामन महाजन, महेंद्र महाजन, समाधान रमेश महाजन, राजु गोविंदा महाजन, गणेश किसन महाजन, बबलू संतोष कराड,नितीन ज्ञानेश्वर भराडी, कन्हैया किसन दहिकर रा.बक्षीपुर अकरा जणांना रावेर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना रावेर न्यायालयात हजर केले.असता त्यांना न्यायालयीन कोठडीमिळुन जामीन मंजूर झाला. डिवायएसपी पिंगळे तळ ठोकुन रसलपुर येथील घटनेच्या नंतर उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे हे दोन दिवसापासून रावेर येथे तळ ठोकून आहेत. रावेर पोलीस स्टेशनला दोन वेग-वेगळे गुन्हे दाखल आहेत. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अमृत पाटील, पोलिस नाईक जितेंद्र पाटील व सहकारी तपास करीत आहे. दरम्यान रसलपुर गावात शांतता असुन पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.