धनाजी नाना महाविद्यालयात दोन दिवसीय ‘राष्ट्रीय परिसंवाद’चे आयोजन

फैजपुर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषद मुंबई यांच्या सहकार्याने कोरोना नंतरच्या काळातील ‘वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रातील स्पर्धात्मक फायदे’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद’ चे आयोजन करण्यात आले आहे.

त्या निमित्त आज रोजी पत्रकार परीषदचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी प्राचार्य. डॉ.पी आर चौधरी, उप प्राचार्य डॉ.ए.आय.भंगाळे, वाणिज्य विभागाचे प्राध्यापक. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.जी.जी.कोल्हे, डॉ. रवी केसूर,प्रसिद्धी प्रमुख डॉ. विजय सोनजे, व परिसरातील 14 नामांकित वृत्त पत्रांचे पत्रकार बांधव उपस्थित होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ. पी. आर चौधरी यांनी  पत्रकार परिषदेत 12-13 मार्च 2022 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय परिसंवादाच्या अयोजनाविषयी माहिती दिली.

‘महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषद’ ही वाणिज्य क्षेत्रात कार्यरत असलेली एक मोठी संघटना आहे जिच्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रगतीसाठी अनेक घटकांचा अभ्यास करून वेळोवेळी शासकीय यंत्रणांना मार्गदर्शन केले जाते. विविध विषयांवर संवाद आणि संशोधन करून सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातात. राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर अत्यंत व्यापक स्वरूपात कामगिरी बाजावलेल्या या परिषदेचे वार्षिक अधिवेशन फौजपुर येथे होणार आहे, फौजपुर हे स्वतंत्र भारताच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शहर आहे,स्वातंत्र्य समरातील एक घटक म्हणून स्व.धनाजी नाना चौधरी यांच्या प्रयत्नांनी आयोजित करण्यात आलेले फैजपुर येथील 1936 चे राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण अधिवेशन अत्यंत महत्वाचे आहे,या अधिवेशनात महात्मा गांधी,पंडित जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोर, सरदार वल्लभभाई पटेल,खान अब्दुल गफार खान,साने गुरुजी सारखे महान  विभूती उपस्थित होते.

या सर्व विभूतींच्या कार्याची प्रेरणा घेऊन त्यांच्या स्मृतींची जाणीव नवीन पिढ्यांना होत राहावी यासाठी स्व. मधुकरराव चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ई.स. 1960 मध्ये तापी परीसर विद्यामंडळची स्थापना करून धनाजी नाना महाविद्यालयाची स्थापना केली, महाविद्यालयाच्या माध्यमातून परिसरातील ग्रामीण, आदिवासी भागातील युवकांसाठी उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. तसेच या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोकसेवक स्व.बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी जी.एस.वाणिज्य महाविद्यालय,वर्धा येथून वाणिज्य विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. या गोष्टीचा अभिमान वाटतो या सर्व गोष्टी लक्षात घेता त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी तसेच परिसरातील जनतेला राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या सामाजिक आर्थिक तसेच राजकीय बदलांबद्दल माहिती मिळावी आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

परिसंवादात संपूर्ण भारतातून 350 संशोधक आपले शोधपत्र सादर करणार आहेत, त्यात कोविड’नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात झालेला परिणाम व त्याची कारण मीमांसा शोधून उपयात्मक नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. या परिसंवादाचे उदघाटन  दि.12/03/2022 रोजी सकाळी ठीक 10 :00 वाजता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजिय तांबे यांच्या हस्ते होणार आहे, परिषदेच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष व रावेर-यावल विधानसभेचे आ.शिरीष चौधरी असतील,तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ.उल्हास पाटील व तापी परिसर विद्यामंडळ,फैजपुरच्या कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेचे पदाधिकारी उपस्थित असतील.

परिसंवादा दरम्यान वाणिज्य व व्यवस्थापन या विद्याशाखेच्या विकासासाठी महत्वाची भूमिका असलेले निवृत्त प्राध्यापकांना आमंत्रित केले आहे त्यांचा ही  मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे. परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी दि. 13/03/2022 रोजी समारोप होणार आहे समारोप समारंभाचे अध्यक्ष प्रा. के.आर.चौधरी व्हा.चेअरमन तापी परिसर विद्यामंडळ,फैजपुर हे आहेत, तसेच प्रमुख अतिथी म्हणून शरद महाजन,अध्यक्ष, तंत्र व वैद्यकीय शिक्षण संस्था,फैजपुर व प्राचार्य डॉ.अरविंद चौधरी, बोदवड मागविद्यालय हे उपस्थित असतील,

या प्रसंगी वाणिज्य व व्यवस्थापन शाखेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, संशोधकांना,पुस्तक लेखकांना महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेच्या वतीने

1.डॉ. पी सी शेजवलकर व महादेवराव तल्हार उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

2.रमण परशुराम उत्कृष्ट लेखक पुरस्कार

3.सौरभ शिवार स्मृती तरुण संशोधक पुरस्कार  असे विविध पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

सर्व रूपरेषा प्रा. पी. आर चौधरी यांनी मांडली पत्रकार परिषदेचे सूत्र संचालन व प्रास्ताविक उप प्राचार्य डॉ. ए आय.भंगाळे यांनी तर आभार डॉ. जी. जी. कोल्हे यांनी मानले, कर्यक्रमच्या यशस्वी आयोजनासाठी नितीन सपकाळे, शेखर महाजन, चेतन इंगळे, प्रकाश भिरुड यांनी सहकार्य केले.

 

Protected Content