Home क्राईम रस्त्यात खड्डे खोदण्यास विरोध केल्याने दोन्ही भावांना बेदम मारहाण; गुन्हा दाखल

रस्त्यात खड्डे खोदण्यास विरोध केल्याने दोन्ही भावांना बेदम मारहाण; गुन्हा दाखल


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रिधूर गावात रस्त्याच्या वादातून दोन गटात झालेल्या वादाचे पर्यावसान भीषण हाणामारीत झाले आहे. गुरांच्या शेडसाठी वापरच्या रस्त्यात खड्डे खोदण्यास विरोध केला असता, पाच जणांच्या टोळीने दोन भावांवर लोखंडी पहार आणि दांडक्यांनी हल्ला करून त्यांची डोकी फोडल्याची घटना रविवारी १८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याबाबत रात्री ११ वाजता पाच जणांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेली माहिती अशी की, रिधूर येथील रहिवासी फिर्यादी धनराज बुधा पाटील (वय ५१) आणि त्यांचे भाऊ वसंत पाटील हे रविवारी १८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आपल्या घरापाशी होते. यावेळी त्यांच्या वापराच्या रस्त्यामध्ये गावातीलच शरद एकनाथ कोळी हा गुरांच्या शेडसाठी खड्डे खोदून बांधकाम करत होता. सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे अतिक्रमण होत असल्याचे पाहून पाटील बंधूंनी त्यास विरोध केला.

खड्डे खोदण्यास मनाई केल्याचा राग आल्याने आरोपी शरद एकनाथ कोळी, विशाल ईश्वर कोळी, अजय ईश्वर कोळी, अनिताबाई शरद कोळी आणि अक्षय सुर्यभान कोळी यांनी संगनमत करून पाटील बंधूंना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता, शरद कोळी याने हातातील जड लोखंडी पहारीने वसंत पाटील यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या भीषण हल्ल्यात वसंत पाटील यांचे डोके फुटून ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्याच वेळी विशाल कोळी याने लाकडी दांडक्याने फिर्यादी धनराज पाटील यांच्या डोक्यावर वार करून त्यांनाही जखमी केले.

या गंभीर घटनेनंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. फिर्यादी धनराज पाटील यांच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय निकम या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Protected Content

Play sound