अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अकोला जिल्हयातील तेल्हारा-बेलखेड मार्गावर दोन दुचाकीची समोरासमोरा धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. त्यास उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, दोन दुचाकी तेल्हारा-बेलखेड मार्गावरून जात होते. दोन्ही दुचाकीवर दोन जण बसलेले होते. त्या दोन्ही दुचाकीची समोरासमोरा धडक झाली. त्यामुळे या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. या अपघातातील मृतांमध्ये दोन तरूणी आणि एक महिलेचा समावेश आहे. या घटनेतील मृत दोन्ही तरूणी एकाचा कुटुंबातील असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताचा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.