एनडीएमधील दोन मोठे नेते इंडिया आघाडीच्या संपर्कात

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवर असली तरी काँग्रेसनेही जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे काँग्रेसचा उत्साह वाढला आहे. आपण केंद्रात सरकार बनवू शकतो असे काँग्रेसला वाटू लागल्याने आता काँग्रेसनेही हालचाली सुरू केल्या आहेत. सरकार स्थापनेसाठी काँग्रेस आता भाजपच्या एनडीए आघाडीलाच सुरुंग लावण्याच्या तयारीत आहे. टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू आणि जेडीयूचे नेते नितीश कुमार यांच्याशी काँग्रेस संपर्क साधण्याच्या हालचाली काँग्रेसने सुरू केल्या आहेत. त्यामुळे भाजपचे टेन्शन वाढणार आहे.

लोकसभेच्या 542 जागांचे कल हाती आले आहेत. त्यापैकी 289 जागांवर भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी 233 जागांवर आघाडीवर आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. 21 जागा इतरांच्या खात्यात जाताना दिसत आहेत. आजच्या निवडणूक कलांमुळे इंडिया आघाडीचा प्रचंड आत्मविश्वास वाढला आहे. या कलांचं निकालात रुपांतर झालं तर इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी मजबूत हालचाली करू शकते. त्यासाठी त्यांना सर्वाधिक गरज जेडीयू आणि टीडीपीची भासणार आहे.

इंडिया आघाडीला आपण सत्तेत येऊ असे वाटते आहे. बहुमतासाठीचा 272 च्या आकड्यापासून इंडिया आघाडी दूर आहे. इंडिया आघाडीला बहुमत गाठण्यासाठी 30 जागांची गरज पडू शकते. त्यामुळेच इंडिया आघाडीने आता टीडीपी आणि जेडीयूला संपर्क साधण्यास सुरू केला आहे. या दोन्ही पक्षांना सोबत घेऊन सत्तेचा डाव मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं सूत्रांनी सांगितलं. बिहारमध्ये जेडीयूला चांगलं यश मिळालं आहे. जेडीयू बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. जेडीयू जवळपास 16 जागांवर आघाडीवर आहे. तर टीडीपी 15 जागांवर आघाडीवर आहे.

 

 

Protected Content