शेअरमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत दोन भामट्यांना राजस्थानातून अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील उच्चशिक्षीत व्यक्तींना शेअर मार्केट्रमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीचे आमिष दाखवत तब्बल सव्वा दोन कोटींची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना राजस्थान येथून जळगाव सायबर पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत जळगाव सायबर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील उच्चशिक्षीत प्राध्यापिका, डॉक्टर, शिक्षक व व्यावसायिकांना आरोपींनी शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास त्यात जादा नफा मिळेल, या आमिषाने प्रत्येकाची लाखो रूपयांची फसवणूक केल्याच्या घडना घडलेल्या आहेत. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार जळगाव सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पथकाला सुचना देवून शोधमोहिम राबविण्यात आली. त्या तांत्रिक विश्लेषणातून दोन जणांनी नावे समोर आली. त्यानुसार दोघांना अटक करण्याबाबत कारवाईच्या सुचना देण्यात आल्या. त्यानुसार जळगाव सायबर पथकाने क्रिप्टो करन्सी वॉटले वापरणारा संशयित आरोपी मोहम्मद इस्त्राईल आणि बँकेचे करंट खाते कमिशनवर देणारा अनिल कुमार यांना राजस्थान येथील बाडमेर येथून अटक केली आहे.

ही कारवाई सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हवालदार प्रवीण वाघ, राजेश चौधरी, दिलीप चिंचोले, दीपक सोनवणे आदींनी केली आहे.

Protected Content