Home क्राईम बसस्थानक परिसरातून दुचाकी लांबविणाऱ्या दोघांना अटक; गुन्हा दाखल

बसस्थानक परिसरातून दुचाकी लांबविणाऱ्या दोघांना अटक; गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव बसस्थानकातून दुचाकीची चोरी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना जिल्हापेठ पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याकउून चोरीला गेलेली दुचाकी जप्‍त करण्यात आली आहे.

जळगाव येथील बसस्थानक परिसरातून एकाची दुचाकी चोरी केल्याची घटना घडली होती. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गोपनीय बातमी मिळाली. त्याआधारे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून संशयित आरोपींना निष्पन्न केले. यात पोलीसांनी दुचाकी चोरी करणारे संशयित आरोपी आकाश राजू खरे (रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) आणि आकाश प्रकाश भिल (रा. कासमपुरा, ता. पाचोरा) यांना अटक करण्यात आली.

त्यांची कसून चौकशी केली असता पोलीसांनी चोरीची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीए ५०११) जप्त केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत प्रभारी अधिकारी अनिल वाघ, शांताराम देशमुख, महेश महाजन, महेंद्र पाटील, मिलिंद सोनवणे, तुषार पाटील, विशाल साळुंखे, गोविंद साबळे आणि जयेश मोरे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार महेंद्र पाटील करत आहेत.


Protected Content

Play sound