यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लेखक भास्कर चंदनशिव यांनी आपल्या ‘अंगारमाती’ या कथासंग्रहात ‘लाल चिखल’ हि कथा लिहली होती. ज्यात आपला माल वेळेवर विकला न गेल्याने शेतकरी वैतागत सर्व टमाटे खाली फेकत पायदळी चिरडतो. तशीच काहीशी घटना तालुक्यातील दहिगाव येथे घडली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, “चौदा ते पंधरा महिन्याच्या वरती ऊसाचे वय झाले असताना देखील मुक्ताईनगर साखर कारखान्याने शेतकऱ्यांचा वेळेवर ऊस तोडलेला नसल्याने तालुक्यातील दहिगाव येथील राजेंद्र नीळकंठ महाजन व निळकंठ महाजन यांनी त्यांचे ३१/१ या या गट नंबरमधील दोन एकर ऊस गुरांना चालण्यासाठी मोकळा करून दिला तर उर्वरित क्षेत्र जाळून टाकले आहे.
फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना बंद पडल्यामुळे यावल, रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुक्ताईनगर साखर कारखाना अशाप्रकारे चेष्टा करीत हाल करीत आहे. मधुकर सहकारी कारखाना सुरू असताना मुक्ताईनगर साखर कारखाना मात्र या कार्यक्षेत्रात अतिक्रमण करून ऊस खरेदी करीत होता व मस्तकाच्या कार्यक्षेत्रातील लागवड असलेला ऊस कमी करत होता. अशाप्रकारे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.”
कारखान्याने त्वरित याकडे लक्ष घालावे किंवा शासनाने अशा पद्धतीने फसगत झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील राहिलेल्या उसाचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. अशी मागणी असंख्य उस उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.