भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बनावट नोटा प्रकरणात तालुक्यातील साकेगाव येथून अटक करणार्या आलेल्या दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
खर्या नोटांच्या बदल्यात जास्त रकमेच्या बनावट नोटा देण्याचे रॅकेट पोलिसांनी उघड केले असून यात साकेगाव येथील महिलेसह एकाला अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती जामनेर तालुक्यातील लाखोली येथील हनीफ अहमद शरीफ देशमुख हा आहे. या दोघांना भुसावळ येथील न्यायालयात सादर करण्यात आले असता न्यायाधिशांनी दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या रॅकेटमध्ये अजून काही जण असण्याची शक्यता असून पोलीस याच दिशेने तपास करत आहेत. या प्रकरणातील नोटा नाचणखेडा येथे छापण्यात आल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली असून याबाबत पोलीस तपास करत आहेत. या संदर्भात काही जणांची चौकशी देखील करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्थानकाचे निरिक्षक विलास शेंडे आणि त्यांचे सहकारी करत आहेत.