Home राष्ट्रीय हेलीकॉप्टर घोटाळ्यातील दोन आरोपींचे प्रत्यार्पण

हेलीकॉप्टर घोटाळ्यातील दोन आरोपींचे प्रत्यार्पण

0
35

नवी दिल्ली वृत्तसंस्था । अगस्ता वेस्टलँड घोटाळा प्रकरणातील आरोपी राजीव सक्सेना आणि दीपक तलवार यांना प्रत्यार्पण करून भारतात आणण्यात आले आहे.

ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळयात अलीकडेच ख्रिश्‍चिअन मिशेल या दलालास अटक करण्यात आली होती. यानंतर आता राजीव सक्सेना आणि दीपक तलवार या दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. दुबईतील अकाऊंटंट राजीव सक्सेना यांचं दुबईहून भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी दिपक तलवार यांचेही प्रत्यार्पण करण्यात आलं आहे. सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) टीमने एका विशेष विमानाने त्यांना भारतात आणलं. काल रात्री उशीरापासूनच त्यांची इडीतर्फे चौकशी सुरू आहे.

राजीव सक्सेना दुबईत वास्तव्यास असून ईडीने त्यांना अनेकदा चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. मात्र त्यांनी तपासात सहकार्य केलं नाही. ईडीने चार्जशीटमध्ये राजीव सक्सेना यांच्या नावाचा उल्लेख केला असून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला होता. दुबईतील अधिकार्‍यांनी त्यांना अटक करून भारतीय पथकाला सोपविले. त्यांची पत्नी शिवानी सक्सेनाही घोटाळ्यात सहभागी होती. शिवानी सक्सेना यांनी २०१७ मध्ये चेन्नई विमानतळावर अटक करण्यात आली होती. सध्या त्या जामीनावर आहेत. दरम्यान, दीपक तलवार हा कार्पोरेट लॉबीस्ट म्हणून काम करत होता. त्याचीही या प्रकरणातील भूमिका संशयास्पद आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound