धक्कादायक : पाच वर्षांत २ कोटी पुरुष बेरोजगार झाले ; ‘NSSO’ चा अहवाल


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाच वर्षांत जवळपास दोन कोटी पुरूष बेरोजगार झाले, असा धक्कादायक खुलासा NSSO (नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस) च्या अहवालातून झाला आहे.या अहवालनुसार ५ वर्षांत २ कोटी पुरूष बेरोजगार झाले आहेत. बेरोजगारीच्या या आकड्यांमुळे केंद्रातील मोदी सरकार पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. दरम्यान, सरकार अडचणीत येईल म्हणून जाणून-बुजून हा सर्व्हे प्रकाशित करत नसल्याचा आरोप आता केला जात असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

 

याबाबत ‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी दैनिकाने वृत्त दिले आहे की, केंद्रातील मोदी सरकारने दरवर्षी कोट्यवधी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. पण NSSO ने केलेला सर्व्हेत धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. ‘२०१७-१८ या वर्षात NSSO ने केलेल्या सर्व्हेमधून खुलासा झाला आहे की, पुरुष कामगारांची संख्या २८ कोटी ६० लाख एवढी घसरली आहे, जी २०११-१२ मध्ये ३० कोटी ४० लाख एवढी होती. तसेच २०११-१२ पासून आतापर्यंत एकूण ४ कोटी ७० लाख रोजगार कमी झाले आहेत. या रिपोर्टमध्ये शहरी आणि ग्रामीण भागाची वेगवेगळी आकडेवारीही देण्यात आली आहे. त्यानुसार शहरात बेरोजगारी दर ७.१ टक्के एवढा राहिला आहे तर ग्रामीण भागात हा दर ५.८ टक्के एवढा आहे.’ असे इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटले आहे. NSSO ने केलेला सर्व्हे पूर्ण झाला असला तरीही सरकारकडून तो अद्याप प्रकाशित करण्यात आलेला नाही. परंतु इंडियन एक्सप्रेसने या सर्व्हेचा आढावा घेतला असल्याचे म्हटले आहे.

Add Comment

Protected Content