जळगाव प्रतिनिधी । येथील जिल्हा कारागृहातून क्षमतेपेक्षा जास्त बंदी असल्याने यातील वीस बंद्यांना शनिवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात जालना कारागृहात रवाना करण्यात आले आहे. तर काही बंद्यांना कारागृह प्रशासनाने नाशिक,औरंगाबाद व जालना येथे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
बंदी पलायनातील संशयितांना आधीच नाशिकला पाठविण्यात आले आहे. गेल्या महिन्यातही अकरा बंद्यांना जालना येथे पाठवण्यात आले होते. काल शुक्रवारी रवींद्र रमेश जगताप उर्फ चिन्या (३५, रा. शिवाजीनगर ) या बंड्याच्या मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आज शनिवारी तातडीने २० बंद्यांना जालना येथे रवाना करण्यात आले. मुख्यालयाचे राखीव पोलीस उपनिरीक्षक मदनसिंग चव्हाण यांच्यासह कर्मचारी रवाना झाले आहेत. जालन्यापर्यंत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद्यांच्या वाहनाला पायलेटींग देण्यात आली.