चाळीसगाव (प्रतिनिधी) पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या हत्येच्या निषेधार्थ येथील व्यापारी बांधवांनी आज स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवून निषेध नोंदवला. व्यापारी बांधवांनी सगळ्यांना या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आव्हान केले. तसेच जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला व शहीद जवानांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी व्यापारी असोशियनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी आमदार राजूदादा देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शशिकांत साळुंखे, श्रीकांत राजपूत, स्वप्निल कोतकर, अविनाश पाटील, राजेंद्र रामदास चौधरी, महिंद्र जैन, पंचमचे संभा जाधव, श्याम देशमुख, संभाजी सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, मुस्लिम समाजाचे मुराद पटेल, अरविंद पाटील आदी कार्यकर्ते तसेच व्यापारी उपस्थित होते. काल सकाळपासूनच शहरात विविध संघटना संस्था यांचे मार्फत पुलवामा येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला जात असून अजूनही अनेक संघटना मित्र मंडळे यांनी जवानांना श्रद्धांजली निषेधाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती आहे.