मुंबई प्रतिनिधी । येथे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव भरगच्च भरल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
तुळशी तलावाची पाणीसाठ्याची क्षमता १३९.१७ मीटर इतकी आहे. आज सकाळी या तलावाने १३७.१० मीटर एवढी पाणी पातळी गाठली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तुळशी तलाव हा एक तलाव आहे. मुंबईला वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा लागतो. सध्या तलावात ६ लाख ३५ हजार ६५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मुंबई आणि धरणक्षेत्र परिसरात असाच पाऊस सुरू राहिल्यास मुंबईत सुरू असलेली 10 टक्के पाणी कपात रद्द होऊ शकते, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.