तुतारीचे ठरले : जळगाव जिल्ह्यातील ‘या’ उमेदवारांची यादी जाहीर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात जळगाव जिल्ह्यातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. जिल्हयातील मतदारसंघात नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता होती.

या अनुषंगाने आज पक्षाच्या वतीने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ४५ उमेदवारांची नावे असून जळगाव ग्रामीणमधून माजी मंत्री गुलाबराव देवकर, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे, जामनेरमधून दिलीप खोडपे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ते महाविकास आघाडीचे घटक म्हणून कौल मागणार आहेत. दरम्यान जिल्ह्यातील अन्य उमेदवारांची नावे उद्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Protected Content