पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका धाडसी चोरीची घटना उघडकीस आली आहे. खडकदेवळा परिसरातून १५ लाख १० हजार ७८५ रुपये किमतीचा लोखंडी सळाखांनी भरलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.
फिर्यादी विलास रामू विसपुते (रा. सावखेडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा ट्रक (क्र. MH 18 BA 5556) हा सळाखांनी भरलेला होता. चोरट्यांनी संधी साधून ट्रकसह संपूर्ण माल लंपास केला आहे. पाचोरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.




