भुवनेश्वर (वृत्तसंस्था) वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून एका ट्रक चालकाला चक्क ८६ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. संभलपूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ही कारवाई केली आहे.
चालक अशोक जाधव यांच्याकडे ट्रक (क्रमांक एनएल ०१ जी १४७०) आहे. हा ट्रक नागालँडमधील आहे. मात्र या चालकाने पोलिसांबरोबर पाच तास हुज्जत घालती. त्यानंतर काही कागदपत्र सादर केल्यानंतर त्याला ७० हजारांचा दंड भरण्यास सांगण्यात आले. ३ सप्टेंबर रोजी हा सर्व प्रकार घडला. या चालकाने तीन दिवसानंतर दंडाची रक्कम आरटीओ कार्यालयात भरल्यानंतर ट्रक त्याच्या ताब्य़ात देण्यात आला. या इतक्या मोठ्या दंडाच्या पावतीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. देशात १ सप्टेंबरपासून नवीन मोटर आणि वाहन कायदा लागू झाला आहे. या नवीन कायद्यानुसार वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दंड करण्यात येत आहे.