यावल (प्रतिनिधी) पुलवामा येथे दहशदवादयांनी घडवुन आणलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना येथे भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या हल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तालुका चालक मालक संघाच्या वतीने या दहश्दवादी हल्याच्या निषेर्धात यावल ते भुसावळ, यावल ते चोपडा, यावल ते फैजपुर, व इतर ग्रामीण भागात प्रवाशी वाहतुक करणाऱ्या सुमारे ८०० वाहन चालकांनी यावेळी आपला सहभाग नोंदविला.
सकाळी भुसावळ टी पाँईटवर शेकडो युवकांनी दहशदवादी हल्याचा निषेध नोंदवला. यावेळी पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. शहरातील व्यापारी बांधवांनी आपली दुकाने व व्यवसाय पुर्णपणे बंद ठेवले. येथील स्वामी विवेकानंद प्रायमरी इंग्लीश स्कुलच्या वतीने देशासाठी वीरमरण प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणुन दिनांक १७रोजी रविवारच्या दिवशी होणार असलेले स्नेह संमेलना कार्यक्रम रद्द केला आहे. स्नेह संमेलनाचा निधी व अन्य निधी जमा करून तो महाविद्यालयातर्फे शहीदांच्या कुटंबांना मदत म्हणून देण्यात येणार आहे.