Home Cities जामनेर पहूर शहर पत्रकार संघटनेतर्फ मान्यवरांना श्रद्धांजली

पहूर शहर पत्रकार संघटनेतर्फ मान्यवरांना श्रद्धांजली

0
21

 

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर शहर पत्रकार संघटनेच्या वतीने साप्ताहिक कांग परिसरचे संपादक बद्रीप्रसाद शर्मा, दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी योगेश पाटील आणि पुण्य प्रतापचे संपादक वसंतराव पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार शांताराम आप्पा लाठे , पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शरद बेलपत्रे, मनोज जोशी, गणेश पांढरे, सरपंच पती रामेश्‍वर पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी पत्रकार संघाचे सचिव जयंत जोशी , रवींद्र लाठे , किरण जोशी , चेतन रोकडे , गणेश मंडलिक , शरद नरवाडे आदींची उपस्थिती होती.शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर भामेरे यांनी सूत्रसंचालन केले तर माजी उपाध्यक्ष रवींद्र घोलप यांनी आभार मानले.


Protected Content

Play sound