कै. गिरीश पाटील यांना 10 एप्रिल रोजी नाशिक येथे श्रद्धांजली

0
25


WhatsApp Image 2019 04 07 at 2.39.36 PM

अमळनेर (प्रतिनिधी )  नुकतेच मारवड गावाचे प्रेरणास्थान  गिरीश पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. स्व.गिरीशदादांच्या पवित्र आत्म्याला चिरशांती लाभावी यासाठी शोकसभेचे आयोजन 10 एप्रिल रोजी बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता नाशिक, सिडको तोरणानगर येथे अरुण चौधरी यांचा घराजवळ करण्यात आले आहे.

 

स्व.गिरीश पाटील  व त्यांच्या परिवारावर स्नेह असणा-या आणि व्यवसाय व नोकरीनिमित्त नाशिक येथे असलेल्या सर्व मारवडचे रहिवासी व नातेवाईक, हितचिंतक त्यांचे परिवार यांनी स्व.गिरीशदादा यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहावे. यावेळी गिरीशदादा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक सुप्रसिद्ध अहिराणी साहित्यीक डॉ.बापूराव देसाई हे लेखन करणार आहेत.ते उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी   विजय भदाणे, संदेश शिंदे, संतोष चौधरी नाशिकचे शिक्षण विभागातील अधिकारी योगेश सोनवणे , राकेश  साळुंखे हे उपस्थित राहणार आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here