जळगाव, प्रतिनिधी | आदिवासी चेतना परिषदेतर्फे सामाजिक जाणिवेतून नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी आदिवासी दिवसानिमित्त उद्या (दि.४ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता शहरातील सिंधी कॉलनीरोडवरील पद्मावती मंगल कार्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

आदिवासींमधील जळगाव जिल्ह्यातील टोकरे कोळी, भिल्ल, तडवी भिल्ल, पारधी, ठाकुर व इतर आदिवासी जमातीच्या गुणवंतांचा सत्कार याठिकाणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी चेतना परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. श्रीधर साळुंके असतील. तर प्रमुख पाहुण्यांमध्ये आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार राजुमामा भोळे, समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, से.नि, परिवहन आयुक्त गोविंद सैंदाणे, जि.प. शिक्षण सभापती पोपट भोळे, उपमहापौर आश्विन सोनवणे, आदिवासी प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे, शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील, एकता परिषदेचे सुनील गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार
आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे सचिव अजय कोळी यांनी केले आहे.