यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा, यासाठी आदिवासी विकास विभागाकडून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी,पदव्यूता अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणेकामी शिष्यवृती देण्यात येते. पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी, पीएचडी अभ्यासक्रमास क्यूएवम वर्ल्ड विरंग २० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशीत अशा ४९ विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृती मंजूर केली जाते.


सदर योजनेचा लाभ घेण्यासाठीचे निकष खालीलप्रमाणे:
विद्यार्थी अनुसूचित जमातीचा, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी,जमातीचे वैधता प्रमाणपत्र असावे. परदेशातील क्यूएस अद्यावत वर्ल्ड रेकींग मध्ये २०० च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थ्यांला प्रवेश मिळालेला असावा. विद्यार्थ्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम किवा पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना या पूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची किंवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. परदेशातील प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी वयाची कमाल मर्यादा ३५ वर्ष आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी वयाची कमाल मर्यादा ४० वर्ष असावी. विद्यार्थ्यांच्या पालकांचे,कुटुंबाचे किंवा विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्यांच्या स्वतः चे उत्पन्न धरुन सर्व मिळणारे वार्षिक उत्पन्न् ८ लाखापेक्षा जास्त नसावे. नोकरीत असतील तर त्यांचे आयकर विवरणपत्र, फॉर्म नं.१६व सक्षम प्राधिकारी यांचेकडील मागील आर्थिक वर्षांचे कुटुंबाचे सर्व मार्गानी मिळणाऱ्या उत्पनाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. इतर विद्यार्थ्यांसाठी सक्षम प्राधिकारी यांचेकडील मागील आर्थिक वर्षांचे कुटुंबाचे उत्पनाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
पीएचडी अभ्यासक्रमासाठी ४ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल ते. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ३वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यसाक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल ते. पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी २ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल ते. एक्झ्युक्युटीव्ह पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमास प्रवेशित असणारा विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार नाही.सदर योजनेचा लाभ एका विद्यार्थ्यांस फक्त एकदा घेता येईल.एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त अपत्यांना ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी,विद्यार्थ्यांनी तसे हमीपत्र करुन देणे बंधनकारक असेल. शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन प्रणाली विकसीत झाल्यानंतर अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. अर्ज भरण्याचे संकेतस्थळ वर्षभर खुले असेल उमेदवारांनी संपूर्णपणे भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करावा.
अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे बंधनकारक राहील.
विहीत नमुन्यातील अर्ज,सक्षम अधिकारी यांनी दिलेला जमातीचा दाखला आणि जमातींचे वैधता प्रमाणपत्र.सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नचा दाखला.पदवी,पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झाल्याचे पुरावे (सनद, मार्कलिस्ट).परदेशातील क्यूएस वर्ल्ड रँकिंग २००पेक्षा कमी असलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळाल्याबाबतचे विनाअट ऑफर लेटर.ज्या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला आहे त्याचे सविस्तर माहिती पत्रिकेची प्रत.आवश्यक ते करारनामे ,हमीपत्रे.शेक्षणिक पार्श्वभूमी आणि पदवीधर अभ्यासक्रमासाठी सज्जता दर्शवणारी दोन राजपत्रित अधिकाऱ्यांचे शिफारस पत्र किंवा विद्यार्थाने शिक्षण घेतलेल्या संस्थेतील दोन प्राध्यापकांची शिफारस पत्रे.संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी वर्षनिहाय आवश्यक असणा-या खर्चाचे अंदाजपत्रक, ज्यामध्ये शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, इतर शुल्क पाठ्यपुस्तके, स्टेशनरी, भोजन व राहण्याचा खर्च, येण्या-जाण्याचा विमानाचा प्रवास यांचा समावेश असावा. सदर योजनेचा अधिक माहितीसाठी प्रकल्प कार्यालय, यावल येथे संपर्क साधण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यावल यांनी केले आहे.


