यावल प्रतिनिधी । येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळा अधीक्षक व अधीक्षिका संघटनेची कार्यकारणी आज शुक्रवारी २४ सप्टेंबर रोजी दुपारी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी मनेष तडवी तर उपाध्यक्षपदी चारूशीला महाजन यांची निवड करण्यात आली आहे.
शहरातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधी अधीक्षक संवर्गातील बैठक आज २४ सप्टेंबर रोजी दुपारी घेण्यात आली. या बैठकीत संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील विविध शासकीय आश्रमशाळांमधील अधीक्षक व अधीक्षिका यांचे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या बैठकीत अनेक अधिक्षकांन आपल्या भेडसावत असलेल्या समस्या व अडचणी उपस्थित केल्या. त्याचप्रमाणे पदोन्नती व बदलीमुळे रिक्त झालेले संघटनेचे विविधपदे भरण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यानुसार आज नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली.
यात अध्यक्षपदी मनेष तडवी, उपाध्यक्षपदी चारुशीला महाजन, सचिवपदी सचिन गडे, प्रसिद्धीप्रमुख विशाल गजरे, खजिनदार त्रिशला शिरसाठ तर सदस्यपदी भारत बारी, सपना देशमुख, पल्लवी चौधरी यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मनिष दळवी यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल येथे अधीक्षक सन वर्गाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत लेखी निवेदन देणार असल्याचे सांगितले बैठक झाल्यानंतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात जाऊन लेखी निवेदन दिले. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी जावेद तडवी सहाय्यक अधीक्षक अहिरे यांनी निवेदन स्वीकारले व कारवाईचे आश्वासन दिले.