जळगाव प्रतिनिधी । सुरभि बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे गुरुपौर्णिमानिमित्त विविध कार्यक्रमासह वृक्षारोपण करण्यात आले.
“आपल्या गुरूनविषयी मनोगत”लेखी स्वरूपात मागविण्यात आले,त्यात सरोजताई वाडकर,साक्षी साखरे,मनीषा म्हाळस,अविता जोशी,मंजुषा राव,स्वाती कुळकर्णी ह्यांनी लेख लिहून आपल्या गुरुं विषयीच्या भावना व्यक्त केल्या. गुरुपौर्णिमेला दीपक टोकेकर ह्यांना त्यांच्या आजारपणासाठी आर्थिक मदतीची गरज होती .सुरभिच्या पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सभासद व सुरभि सुगरण रेसिपी ग्रुप तसेच “रुपाली टेलर” ह्यांनी ऐच्छिक देणगी जमा करून त्यांची मुलगी स्नेहल टोकेकर हिला 15,000 रु चा धनादेश देण्यात आला.
गुरुपौर्णिमानिमित्त रेल्वे कॉलनीतील सिद्धिविनायक मंदिरात गणपतीला प्रिय असलेले शमी व जास्वंदीचे वृक्षारोपण करण्यात आले,ह्यावेळी मंडळाच्या अध्यक्ष स्वाती कुळकर्णी ह्यांच्या हस्ते श्री गणपतीची आरती करण्यात आली. रेवती शेंदुर्णीकर, मंजुषा राव, विनया भावे, सुनीता सातपुते, ज्योती भोकरडोळे, मेघा नाईक, साधना दामले, रोहिणी कुळकर्णी, स्मिता मोहरील, माधुरी फडके,अश्विनी जोशी, व मंदिराचे पुजारी गचके गुरुजी उपस्थित होते.