जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशूराम विठोबा पाटील विद्यालयाच्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरी त्यांनी लॉकडाऊनच्या काळात ज्या ज्या फळांचा आस्वाद घेतला त्या फळांच्या बिया संक्रमित करून त्या बीया पेरून वृक्षारोपण केले.
सदर उपक्रमासाठी इयत्ता पहिलीच्या वर्गशिक्षिका स्वाती पाटील, अशोक चौधरी तसेच इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाच्या माध्यमातून चिमुकल्यांना विविध प्रकारच्या फळझाडांची चांगल्या प्रकारे माहिती झाली तसेच वृक्षसंवर्धन कसे करावे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करायला विद्यार्थ्यांना मिळाले .विद्यार्थ्यांनी आपल्या घरीच राहून काही बीजे पेरली तर काही विद्यार्थ्यांनी वृक्षांची लागवड केली. उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले