चाळीसगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र साहित्य परिषदेचे चाळीसगाव प्रमुख गणेश आढाव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील राष्ट्रीय विद्यालयात आजी- माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे चाळीसगाव प्रमुख गणेश आढाव यांचा बुधवार, २५ ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्याने या दिवसाचे औचित्य साधून शहरातील राष्ट्रीय विद्यालयात आजी-माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते ५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून चाळीसगाव वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर, पर्यवेक्षक पी. पी. पारवे, पी. एन. अमृतकर व जी. एन. शेलार आदी उपस्थित होते. यावेळी वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर हे संवाद साधताना, अलिकडच्या काळात पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने मानवाचे जगणेच कठीण झाले आहेत. त्यामुळे झाडे लावण्याबरोबरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जर घडवले तर निश्चितच विद्यार्थी देखील समाजात माणुसकीचे दर्शन घडवतील. त्याचबरोबर ज्या झाडांनी विद्यार्थ्यांना मायेची सावली दिली. त्याच शाळेतील विद्यार्थ्यांनी मायेची सावली देणारे वृक्ष लागवड केल्याने एका अनोख्या उपक्रमाला सुरुवात केली असल्याचे सदगिर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण, विजय कदम, रोहित सोनवणे, सचिन राठोड, आकाश धुमाळ, पंकज राठोड, गौरव मांडोळे, स्वामी मांडोळे, दिनेश राठोड, दीपक चौधरी, जयेश एरंडे, अनुराज पाटील, निलेश चव्हाण, मोहित वाघ, विजय मुलमुले, गौरव नन्नवरे, ऋषिकेश शिंगटे, विकास धुमाळ व यश शिंपी आदी उपस्थित होते.