Home Cities जामनेर जिकरा स्कूलमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

जिकरा स्कूलमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

0
26

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील जिकरा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या आवारात आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

‘जिकरा एज्युकेशन सोसायटी’ संचलित जिकरा इंग्लिश मिडीयम स्कूल व न्यू ऊर्दू प्राथमिक शाळेच्या माध्यमातून आज शनिवार, दि. १३ ऑगस्ट रोजी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जामनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या सह संस्थेचे अध्यक्ष-रहीम शेख,सचिव-जाकीर शेख,तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद,कर्मचारी व शाळा सल्लागार समितीचे सर्व सदस्य व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांचा शाळेचे अध्यक्ष रहीम शेख व सचिव-जाकीर शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.


Protected Content

Play sound