चोपडा प्रतिनिधी । महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्रातील प्रत्येक शहीद जवानांच्या स्मारकासमोर वृक्षारोपण करण्याचे महाराष्ट्र शासन व सामाजिक वनीकरण विभागाने ठरविले असून शहीद नाना सैंदाणे स्मारक माध्यमिक विद्यालय नागलवाडी येथे जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक मोहनलाल गुजराथी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी वर्धा येथील आश्रमात लावलेल्या पिंपळच्या झाडापासून तयार केलेली पिंपळाची रोपे प्रत्येक शहीद जवानांच्या स्मारकासामोर लावण्यात आले. तसेच प्रकाश मोरणकर (IFS उपवनसंरक्षक यावल वनविभाग), व्ही.एच.पवार (सहा वनक्षेत्रपाल चोपडा), पी.बी.पाटील वनक्षेत्रपाल चोपडा, वनक्षेत्रपाल वैजापूर समाधान सोनवणे, वनक्षेत्रपाल यावल विक्रम पदमोर, वनक्षेत्रपाल कर्जाने संजय साळुंखे, वनक्षेत्रपाल देवझिरी अतुल जैनक, सहा वनक्षेत्रपाल चोपडा दत्तात्र्य लोंढे, वनक्षेत्रपाल वैजापूर बी.डी. कुंवर, माध्यमिक विद्यालय नागलवाडीचे मुख्याध्याक ए.ए.ढबू यांच्या हस्ते देखील वृक्षारोपण करण्यात आले. प्रकाश मोरणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक गुजराथी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.बी.पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक वनीकरण विभाग कर्मचारी, माध्यमिक विद्यालय नागलवाडीचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रा.पं.नागलवाडीचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.