बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अग्रवाल महासभेने देशभरात 50 लाख वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प केला असून याचा शुभारंग येथील जयनगरातल्या पंचमुखी हनुमान मंदिरातील मारूतीरायाला वंदन करून करण्यात आला.

बोदवड येथील जयनगरात अलीकडेच पंचमुखी हनुमान मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून परिसरातील भाविकांची येथे दर्शनासाठी रीघ लागत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, शनिवारी येथे वृक्षारोपण करण्यात आले. अग्रवाल महासभेने देशभरात तब्बल 50 लाख वृक्षांचे रोपण करण्याचा निर्णय जाहीर केला असून याचा शुभारंभ पंचमुखी हनुमानाला वंदन करून या भागात वृक्षारोपण करण्यात आला. यात या परिसरात अकरा वृक्षांचे रोपण करण्यात आले.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते संजय वराडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा याप्रसंगी सत्कार देखील करण्यात आला. याप्रसंगी अखील भारतीय अग्रवाल संघटनेचे महामंत्री गोपाल अग्रवाल, जगदीश अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल, अमोल अग्रवाल, दीपक अग्रवाल, संजय अग्रवाल आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



