पाचोरा-जळगाव महामार्गाच्या बाजूला वृक्षारोपण

tree plantation pachora

पाचोरा प्रतिनिधी । सध्या काम सुरू असणार्‍या पाचोरा-जळगाव महामार्गाच्या बाजूला बापू हटकर व त्यांच्या सहकार्‍यांनी वृक्षारोपण केले आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या पाचोरा ते जळगाव या महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. यामुळे आधीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. या अनुषंगाने पर्यावरणाचा समतोल राखला जावा म्हणून नगरसेविका सौ. मालतीताई बापू हटकर यांच्यातर्फे दोन्ही बाजूला वृक्षारोपण करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते बापू हटकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हे वृक्षारोपण केले असून याच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे.

Protected Content