भुसावळ प्रतिनिधी । अंजाळे येथील गौधन कृषी पर्यटन केंद्रात आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
अंजाळे (ता. यावल) येथील गौधन कृषी पर्यटन केंद्रात आज वृक्षारोपण करण्यात आले. यात भुसावळ येथील श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतील सदस्यांनी भाग घेतला. स्वामी नारायण संप्रदायाचे स्वरूपप्रकाशजी स्वामी यांच्या उपस्थितीत गोमाता पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. यानंतर दिवंगत कल्याणीदेवी नागला यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला श्री राधाकृष्ण प्रभात फेरीचे संस्थापक तथा विख्यात व्यावसायिक राधेश्याम लाहोटी यांची विशेष उपस्थिती होती. नागला कुटुंबातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी कृषी पर्यटन केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाला राधेश्याम लाहोटी यांच्यासह जगदीश शर्मा, गोपाळ तिवारी, संजय फालक, अर्जुन पटेल, लालजी पटेल, सुनील घुले, राजेश लढ्ढा, गोविंद हेडा, जी.आर. ठाकूर, मोहन भराडिया, दीपक काबरा, अनुप अग्रवाल, सुनील लाहोटी, चंद्रकांत मंत्री, दिलीप टाक, शामा लढ्ढा, शशी लाहोटी, पद्मा तिवारी, राजेश्री लढ्ढा आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदग्रामचे संस्थापक संतोष नागला, संचालक अभिषेक नागला, रविओम शर्मा, शशिकांत नागला, गौरव शर्मा आदींनी सहकार्य केले.
पहा : वृक्षारोपण कार्यक्रमाचा व्हिडीओ.