Home Cities जळगाव फडणवीस यांच्याहस्ते भंवरलाल जैन यांच्या स्मृतिस्थळी वृक्षारोपण

फडणवीस यांच्याहस्ते भंवरलाल जैन यांच्या स्मृतिस्थळी वृक्षारोपण


fadnvis vruksharopan

जळगाव, प्रतिनिधी | राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी रात्री उशिरा भुसावळ येथे येऊन जैन हिल्सला मुक्कामी होते.

 

आज सकाळी फडणवीस यांनी जैन कुटुंबियांच्या भेटीनंतर भवरलाल जैन यांच्या कल्पनेतून साकारलेल्या जैन व्हॅली येथील ‘भाऊंची सृष्टी’ या ठिकाणास भेट दिली. तेथील भाऊंचे स्मृतिस्थळ असलेल्या वाटिकेत त्यांच्याहस्ते तुळशीचे रोप लावण्यात आले. यावेळी त्यांनी कांताबाई जैन आणि भवरलालजी जैन यांचे स्मृतिस्थळ असलेल्या श्रद्धाधामलाही भेट दिली.

यावेळी त्यांच्या समवेत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, माजी मंत्री गिरीश महाजन, ‘बेटी बचाव बेटी पढाव’चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, उपाध्यक्ष अनिल जैन, आ.राजूमामा भोळे, आ.मंगेश चव्हाण, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन व अमर जैन हे उपस्थित होते.


Protected Content

Play sound