जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गुजरात पासींगची बस महाराष्ट्र पासींग करुन देण्यासाठी ट्रॅव्हल्समालकाची १५ लाखात २७ हजारात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गुड्डुराजा नगरातील गोकुलधाम अपार्टमेंटमधील शिला राजेश मेहता हे वास्तव्यास आहे. मेहता यांचे पती राजेश मेहता यांनी फाल्कन बस लाईन्स प्रा.लि. ए विजय चेंबर्स ड्रिमलँड सिनेमासमोर ग्रॅन्ट रोड (ई) मुंबई कॉर्पोरेट ऑङ्गिस-सी ००२ श्री कृष्ण कॉम्प्लेक्स वेस्टर्न एक्सप्रेस हायवे बोरवली, हार्दीक इंद्रकुमार कोटक (वय-४०), जयश्री इंदूभाई कोटक (वय-६२), मित्तल हार्दिक कोटक (वय-३८), इंदुकुमार कांतीलाल कोटक (वय-६७) यांच्याकडील जून्या गुजरात पासींगची बस महाराष्ट्र पासींग करुन देण्यासाठी १६ लाखांत व्यवहार झाला होता.
यापोटी मेहता यांनी संबंधितांना दोन लाख रुपये रोख व धनादेशने ५ लाख तर ८ लाख २७ हजार १७८ रुपयांची एन.ई. एङ्गटीद्वारे पैसे दिले होते. पैसे देवूनही संशयितांनी ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे ट्रॅव्हल्स बसचे परमीट करुन न देता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरुन शिला राजेश मेहता यांच्या तक्रारीवरुन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.