रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील वाळूची वाहतूक करतांना मध्यप्रदेश शासनाची वाहतूकीचा परवाना दाखवून मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक होत आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडत असल्याचे समोर आले आहे.
रावेर तालुक्यात वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी रावेर महसूल विभागातर्फे करण्यात येत आहे. चौकशी करतांना मध्यप्रदेश शासनाकडून वाहतूकीची परवाना दाखवून वाळूची वाहतूक करणारे वाहन सोडण्यात येत आहे. वाळू वाहतूक दारांनी आता ही नविन शक्कल वापरली आहे. महसूल पथकाने अवैध वाळुचे ट्रक्टर पकडल्यास स्पॉटवर पंचनामा केला जातो. त्यामध्ये ट्रक्टर नंबर पकडलेल्या टीमचे नाव वेळ व तारीख असते व ट्रक्टर तहसिलमध्ये जप्त देखिल केले जाते. परंतु नंतर अवैध वाळू वाहतूकदार ताबोडतोब मध्य प्रदेश मध्ये जाऊन तेथील अवैध वाळू वाहतुकीचा परवाना आणाले जातात व जप्त केलेल्या वाळूच्या ट्रक्टरचा पंचनाम्यात बदल करावा लागतो. नियमानुसार वाहतूक करीत असल्याचे भासवून दंड न घेताच ट्रेक्टर सोडुन दिले जात आहे. यात मोठे अर्थकारण सुध्दा केले जात असून यात महसूल विभागाचे आतोनात नुकसान होत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.
रावेर तालुक्याच्या हद्दीत असलेले तापी नदी, भोकर परिसर, खिरवड, बार्डी परिसरातून वाळूची मोठ्याप्रमाणावर अवैध वाहतूक होत आहे. दरम्यान मध्यप्रदेशातील पावत्या दाखविल्यामुळे जिल्हा प्रशासनाचा मोठा महसूल बुडत आहे.