जामनेर शहरात ९ कोटी रुपयांच्या मंत्री महाजन यांच्याहस्ते भूमिपूजन
जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोट्यावधीच्या निधी आणून विकास कामे करण्यात आली असून त्यामुळे जामनेर तालुक्याची कायापालट झाली असल्याची प्रतिक्रिया राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील विविध विकास कामाचे भूमिपूजन प्रसंगी बोलताना केले.
जामनेर नगरपालिकेच्या माध्यमातून व ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून शहरातील नऊ कोटी रकमेच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन मंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी आयुश प्रसाद प्रसाद, जिल्हा परिषद परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित अंकित, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, आतिष झाल्टे, डॉक्टर प्रशांत, तहसीलदार नानासाहेब आगळे, नगरपालिका मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, बाबुराव हिवराळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री गिरीश महाजन बोलतांना सांगितले की, जामनेर शहरांमध्ये ३९ कोटी रुपयांचं क्रीडा संकुलन नुकतेच मंजूर झाले आहे, त्याचे काम सुरू होणार असून राजमाता जिजाऊ चौक मध्ये १२ कोटी रुपये निधी खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा व दरबार उभारण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात मंगल कार्यालय उभारणी करण्यात येणार असून त्याच्या भूमिपूजन झाले आहे . वाघूर धरणावर पर्यटन क्षेत्र उभारण्यात आला. येणाऱ्या काळामध्ये आता जामनेर शहराची रेल्वे ही ब्रॉडग्रेज होणार असून त्यामुळे जामनेर तालुका हा देशाशी जोडला जाणार आहे. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना व नागरिकांना होणार असून शेतकरी आपला शेतमाल हा बाहेर कुठे विकायला जाऊ शकतो, त्यामुळे आता येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रगती जामनेर तालुक्याची होणार आहे मी जामनेर तालुक्यात विकास कामे करण्यासाठी नेहमी कटिबद्ध असल्या राहणार असल्याची माहिती असल्याचे प्रतिक्रिया यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यक्रमात बोलताना दिली.