भुसावळ प्रतिनिधी । २०१९ च्या सर्वसाधारण बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार करण्यात आल्या असून यात बाजारपेठ स्थानकातील कर्मचार्यांचा समावेश आहे.
दरवर्षी गृह मंत्रालयाकडून पोलीस कर्मचार्यांच्या सर्वसाधारण बदल्यांचे आदेश काढण्यात येतात. यानुसार जिल्हा पोलीस प्रशासनातील बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वसाधारण पोलीस कर्मचार्यांच्या बदल्या २०१९ मध्ये बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये पाच वर्षे सेवा झालेल्यामध्ये राजेंद्र शरद नाईक (ए.एस.आय), बाळकृष्ण मुकुंदा पाटील (हेड कॉन्स्टेबल),सुनील थोरात(पोलीस नाईक),नरेन्द्र वाणी (पोलीस नाईक), विनोद सपकाळे (पोलीस नाईक),सुनील अहिरे (पोलीस नाईक) अशा पोलीस कर्मचार्यांचा समावेश आहे. तर बारा वर्षे सेवा करणार्यांमध्ये राजेंद्र कोलते (ए.एस.आय),अंबादास पाथरवट (ए.एस.आय), शैला पाचपांडे (ए.एस.आय),अलका झोपे (ए.एस.आय), बाळकृष्ण मुकुंदा पाटील (हेड कॉन्स्टेबल),छोटू वैद्य (हेड कॉन्स्टेबल), जिजीबराव पाटील (हेडकॉन्स्टेबल) सुनील अहिरे (पोलीस नाईक) अशा पोलीस कर्मचार्यांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या १२ कर्मचार्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज दिनांक ७ मे रोजी दिलेला आहे. अधीक्षकांनी पाच व बारा वर्षे सेवा झालेल्या पोलीस कर्मचार्यांची माहिती अचानक मागितल्यामुळे आपल्या होणार्या बदल्या आतापर्यत कुठल्या न कुठल्या राजकीय पुढार्यांच्या आशीर्वादामुळे झाल्या नसल्यामुळे आता झालेल्या बदलीला राजकीय पुढार्यांकडून स्थगित आणतात की अधीक्षकांच्या आदेशाचे पालन करतात याकडे अन्याय झालेल्या पोलीस कर्मचार्यांचे लक्ष लागून आहे.