चाळीसगाव प्रतिनिधी । अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या बदलीस मॅटने स्थगिती दिल्याचे वृत्त आहे.
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यभरातील पोलिस अधिकार्यांच्या बदल्या झाल्या होत्या. बच्छाव यांचीही धुळ्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्यपदी बदली करण्यात आली होती तर त्यांच्या जागी राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक सहाचे समादेशक सचिन पी.गोरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. बच्छाव यांच्या बदलीला काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना त्यांची बदली करण्यात आल्याने त्यांनी बदलीच्या आदेशाविरोधात मॅटमध्ये धाव घेतल्यानंतर त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली आहे. प्रशांत बच्छाव यांची चाळीसगावातील कार्यप्रणाली उत्तम असून त्यांचे सर्व अधिकार्यांवर चांगले नियंत्रण असल्याने येथील अवैध प्रकारांना मोठ्या प्रमाणावर आळा बसला आहे. यामुळे बच्छाव यांनी चाळीसगावात आपला कार्यकाळ पूर्ण करावा अशी सर्वसामान्य नागरिकांची प्रतिक्रिया आहे.
दरम्यान, मॅटमध्ये न्यायमूर्ती मदन त्रंबक जोशी यांच्यासमोर त्यांचे कामकाज चालले असून त्यांच्यातर्फे अॅड.धनंजय ठोके यांनी युक्तीवाद केला असून पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार असल्याचेही सांगितल्या या सदस्य न्यायालयाने बच्छाव यांच्या बदलीची मूळ फाईल मागवले असून याबद्दल राजकीय हस्तक्षेप झाला आहे की काय असे शासनाला विचारून चौकशी होणार असल्याचे वृत्त आहे. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच झालेल्या या बदली साठी सबळ काही कारण आहे का असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला आहे.