मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवण्यात आहे. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.
डीजीपी शुक्ला यांची कारकीर्द वादग्रस्त आणि आरोपांनी भारलेली राहिली आहे. खास करुन राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्याचा त्यांच्यावर मोठा आरोप आहे. त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणूक पार पडत असताना वादग्रस्त अधिकारी जर पदावर असेल तर ही प्रक्रिया निष्पक्षपणे पार पडेल का? याबाबत साशंकता आहे, असा आरोप करत काँग्रेसने शुक्ला यांच्या निवडीवर आक्षेप नोंदवला होता. अखेर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर काँग्रेसने आनंद व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, ही कारवाई आगोदरच व्हायला पाहिजे होती. राज्यातील नेत्यांचे फोन टॅप करणारी व्यक्ती, जिच्यावर असंख्य आरोप आहेत, अशी व्यक्ती जर पोलीस महासंचालक पदावर बसत असेल, तर तो मोठा कट आहे. मुळात त्यांची या पदावर केलेली नेमणूक घटनाबाह्य होती. त्यांच्या माध्यमातून राज्य सरकार विरोधकांवर लक्ष ठेवले जात होते, असा आरोपही विजय वडेट्टीवर यांनी म्हटले आहे. खरे म्हणजे त्यांचा सेवा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना सुट्टी दिली पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले.