यावल प्रतिनिधी | राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत यावल तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित सरपंच यांचा प्रशिक्षण कार्यक्रम नाशिक येथे संपन्न होणार असून यास सर्व नवनिर्वाचित सरपंचांनी उपस्थित रहावे असे आवाहन यावलच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांनी पत्रकाद्वारे केले आहे
महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था नाशिक, राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाच्या मार्गदर्शक सूचनेवरून आणि जिल्हा परिषदेकडून नवनिर्वाचित सरपंच यांच्या प्राप्त माहितीनुसार नाशिक, राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित सरपंच यांच्या चार दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था, विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ नाशिक येथे केले आहे.
दिनांक १३ डिसेंबर ते १६ डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित सरपंच यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या एक दिवस आधी म्हणजेच दिनांक 12 डिसेंबर रोजी प्रशिक्षण स्थळी पोहोचणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नवनिर्वाचित सरपंच यांनी ‘कोविड १९’चे एक किंवा दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र अथवा वैद्यकीय अधिकारी यांच्या फिटनेस सर्टिफिकेट सोबत आणणे आवश्यक आहे.
तसेच प्रशिक्षण संस्था, प्रशिक्षणार्थी सरपंच यांनी स्वतःचे मूळ आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. कोरोनाचे पार्श्वभूमीवर सर्व नवनिर्वाचित सरपंच यांनी आपल्या सोबत इतर व्यक्ती घेऊन येऊ नये. सर्व नवनिर्वाचित सरपंच यांनी प्रशिक्षणास हजर रहावे. कोणीही गैरहजर राहू नये असे आवाहन पंचायत समिती यावलच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांनी पत्रकाद्वारे केले आहे
यात अट्रावल, अंजाळे, आमोदे, भालोद, बामनोद, चिंचोली, डोंगर कठोरा, दहिगाव, डांभुर्णी, हिंगोणा, किनगाव बुद्रुक, नायगाव, मारुळ, सांगवी बुद्रुक, आडगाव खुर्द, बोरावल खु., बोरखेडा बुद्रुक, भालशिव, दुसखेडा, डोणगाव, हम्बर्डी, कोळवद, कोरपावली, कासवे, कोसगाव, महेलखेडी, मोहराळे, नावरे, निमगाव, पिंपरी, राजुरी, सांगवी खुर्द, सावखेडा सिम, टाकरखेडा, उंटावद, वनोली, विरावली, मनवेल यासह यावल तालुक्यातील इतर नवनिर्वाचित सरपंचांनी या प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहणे गरजेचे आहे असे पंचायत समिती यावलच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे