भुसावळ, प्रतिनिधी | रेल्वे स्थानक व रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत (विक्रेता) फेरीवाल्यांविरूद्ध ७ दिवसांची विशेष मोहीम मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातर्फे राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेत २७ ते ३० जुलैपर्यंत ४८ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.
भुसावळ मंडळामध्ये वाणिज्य मंडळाचे वरिष्ठ संचालक आर. के. शर्मा यांनी संचालकांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे आणि रेल्वे स्थानकांवर अनधिकृत (विक्रेता) फेरीवाल्यांविरोधात ७ दिवसांची विशेष मोहीम २७ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत चालविली जात आहे. हे ऑपरेशन केटरिंग अँड मॉनिटरिंग इन्स्पेक्टर, चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर, चीफ तिकिट निरीक्षक आणि आरपीएफचे परीक्षण केले जात आहे. पुढील कारवाईसाठी आरपीएफला नियुक्त करण्यात आले आहे.