Home क्राईम दुदैवी घटना : चक्कर येवून पडल्याने व्यापाऱ्याचा अचानक मृत्यू !

दुदैवी घटना : चक्कर येवून पडल्याने व्यापाऱ्याचा अचानक मृत्यू !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. मोहाडी रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरत असताना ६४ वर्षीय ज्येष्ठ व्यापाऱ्याचा चक्कर येवून पडल्याने अचानक मृत्यू झाला. विरेंद्र रुढाभाई जैठवा (वय ६४, रा. रायसोनी नगर) असे मृत व्यापाऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे जळगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरेंद्र जैठवा हे शहरातील एक परिचित किराणा व्यापारी होते. बुधवारी दुपारी ते आपल्या कामानिमित्त घराबाहेर पडले होते. मोहाडी रस्त्यावरून जात असताना ते आपल्या वाहनात इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबले. पेट्रोल भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ते चक्कर येऊन जमिनीवर कोसळले.

जैठवा हे अचानक खाली पडल्याचे पाहताच पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी तातडीने त्यांच्या दिशेने धाव घेतली. त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि तात्काळ जवळच्या एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजताच त्यांचा मुलगा वैभव जैठवा यांनी त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दाखल करण्यात आले आता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषीत केले.

विरेंद्र जैठवा यांच्या निधनाचे वृत्त समजताच रायसोनी नगर आणि व्यापारी वर्गात मोठी शोककळा पसरली आहे. अत्यंत मनमिळावू स्वभाव असलेल्या जैठवा यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हेड कॉन्स्टेबल गफुर तडवी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Protected Content

Play sound