Home क्राईम ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील दोन्ही भावांचा दुदैवी अंत !

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील दोन्ही भावांचा दुदैवी अंत !

0
181

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील आभोडा रस्त्यावर एका भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. समोरून येणाऱ्या एका अज्ञात ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोन भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. रामदास प्रकाश बारेला आणि करण प्रकाश बारेला (दोघेही रा. गुलाबवाडी) असे मयत झालेल्या तरूणांचे नाव आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

ही दुर्दैवी घटना ८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली. फिर्यादी संजय मळक्या पावरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे मित्र रामदास प्रकाश बारेला आणि करण प्रकाश बारेला (दोघेही रा. गुलाबवाडी) हे त्यांच्या हिरो कंपनीच्या मोटरसायकलवरून (क्र. MP १० R ४७६६) रसलपूरकडून आभोडाकडे जात होते. साईनाथ रसाल पवार यांच्या शेताजवळ समोरून आलेल्या एका अज्ञात ट्रॅक्टर चालकाने आपला ट्रॅक्टर भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार
या धडकेत रामदास आणि करण दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Protected Content

Play sound