एरंडोल येथे माय-लेकीचा करूण मृत्यू !

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील महिलेने आपल्या नऊ वर्षाच्या मुलीसह टोकाचा निर्णय घेत आपले आयुष्य संपविल्याची घटना घडली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, एरंडोल येथील जहांगिरपुरा भागातल्या महादेव मंदिराजवळ सपना प्रकाश माळी ही 33 वषांची महिला आपल्या माहेरी राहत होती. तिच्यासोबत केतकी ही नऊ वषांची मुलगी देखील राहत होती. या महिलेचा सुमारे आठ वर्षांच्या आधी घटस्फोट झालेला होता. यामुळे ती आपल्या मुलीसह माहेरी वास्तव्याला होत्या.

दरम्यान, गुरूवार दिनांक 26 रोजी सपना माळी यांनी आपल्या चिमुकलीसह गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्यांनी टोकाचा निर्णय घेण्याआधी एक चिठ्ठी लिहून यासाठी कुणीही जबाबदार नसल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. तर माय-लेकीच्या करूण अंतामुळे परिसरात्ूान हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content