अरे बापरे… बापाने जगाचा निरोप घेतल्यावर मुलाचा खून झाल्याचे उघड !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील एक धक्कादायक घटना घडली असून रिल स्टार असलेल्या एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक बाब गुरुवारी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. विशेष म्हणजे त्याच्या वडिलांनी दोन दिवसांपूर्वी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना समोर आले आहे. या घटनेमुळे धरणगाव तालुका हादरला आहे. विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील (वय-२२, रा. भोरखेडा ता. धरणगाव ह.मु.एरंडोल) असे मयत झालेल्या रील स्टार तरुणाचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, विकी पाटील हा तरुण एरंडोल शहरात राहत होता. त्याचे आईवडील देखील वेगळे एरंडोल शहरात राहत होते. त्याचे वडील विठ्ठल सखाराम पाटील हे माजी सैनिक होते. विकी पाटील हा कुणाला काहीही न सांगता दोन दिवसांपासून बेपत्ता होता. तर दुसरीकडे मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी विठ्ठल पाटील यांनी गळफास घेवून आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यांनी सुसाईड नोट लिहून स्वतःचे जीवन संपविले होते. या दोन्ही घटनेचा ताळमेळ जुडवून पोलीसांनी तपासाला सुरूवात केली.

अशातच गुरुवारी २७ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास विकी पाटील यांचा मृतदेह भोरखेडा गावाजवळ असलेल्या एका नाल्याजवळ विकी पाटील याचा मृतदेह पुरल्याची धक्कादायक माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी जेसीबीच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेत मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव येथून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षिका कविता नेरकर यांच्यासह धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले आणि पोलीस पथक घटनांसाठी दाखल झाले. दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नाल्यातून बाहेर काढला. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली.

एकीकडे त्यांच्या वडिलांनी सुसाईड नोट लिहून या घटनेची माहिती दिली होती तर दुसरीकडे सुसाईड नोट प्रमाणे त्यांचा मुलाचा मृतदेह देखील आढळून आला. या घटनेमाचे कारण अद्याप किंवा मारेकरी यांच्या संदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content