ट्रॅक्टर पलटीमुळे महामार्गावर वाहतूकीची कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या बांभोरी गावाजवळील पुलाजवळ ट्रॅक्टर पलटी झाल्याने राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. आज दुपारी २ वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेनंतर तीन तासांपासून दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

वाहनांच्या लांबच लांब रांगा
अपघातामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. परिणामी विद्यार्थी, नोकरदार आणि प्रवासी नागरिकांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः अत्यावश्यक सेवा असलेल्या रुग्णवाहिका आणि इतर महत्त्वाची वाहने देखील या कोंडीत अडकली आहेत.

वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस स्थानकातील वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अपघातग्रस्त ट्रॅक्टर हटवण्यासाठी जेसीबी बोलावण्यात आला असून लवकरच महामार्गावरील वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. वाहतूक कोंडीमुळे उन्हात ताटकळत असलेल्या प्रवाशांनी प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Protected Content