महेलखेडी येथे एसटी बस पुजनाचा पारंपारीक कार्यक्रम उत्साहात

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील महेलखेडी गावात यावल एसटी आगारातील बसचे विजयादशमीच्या निम्मित पूजन करण्यात आले दरवर्षी प्रमाणे यंदा ही महेलखेडी गावात चालक व वाहक यांच्या वतीने हा कार्यक्रम राबवला जातो.

यंदाही एस बस पूजनाचा मान चालक सुनील महाजन व छाया महाजन यांचा मुलगा भावेश महाजन यांची पत्नी भाग्यश्री महाजन मोठा मुलगा काशिनाथ महाजन यांची पत्नी सपना महाजन व वाहक तुषार कापले व सोनल कपले यांचा मुलगा लक्षित पूनित या दाम्पत्याला मिळाला यांच्या हस्ते यावल हरिपुरा या बसचे पूजन करण्यात आले. या वेळी चालक आर एम शेख व वाहक अकील तडवी उपस्थित होते . महेलखेडी गावातील महाजन परिवाराच्या माध्यमातुन गेली १७ वर्षापासून आपल्या आवळत्या लालपरीचे विजयादशमी निमित्ताने पुजन करण्याची आगळी वेगळी परंपरा आहे.
अशा आगळ्या वेगळया कार्यक्रमाची परंपरा आहे.या प्रसंगी लोकेश येवले, ललित कपले प्रवीण कपले.ललित पाटील.प्रमोद महाजन,नामदेव झुरकाळे,कपिल झुरकाले.गुंजन महाजन,विक्रम पाटील. अशोक तायडे विक्रम पाटील व महेलखेडी गावातील ग्रामस्थ मोठया संख्येत उपस्थित होते.

Protected Content