Home धर्म-समाज यावलमध्ये १० जुलैला पारंपरिक ‘पेहरन-ए-शरीफ’ उत्सव सादगीने साजरा होणार

यावलमध्ये १० जुलैला पारंपरिक ‘पेहरन-ए-शरीफ’ उत्सव सादगीने साजरा होणार


यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान मानला जाणारा आणि सुमारे १३० वर्षांची परंपरा लाभलेला ‘पेहरन-ए-शरीफ’ उत्सव यंदा १० जुलै रोजी बाबूजीपुरा पंचमंडळीच्या वतीने अत्यंत सादगीपूर्ण पद्धतीने साजरा केला जाणार आहे. धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या उत्सवासाठी यावर्षीही राज्यासह मध्य प्रदेश व गुजरातमधून भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे.

‘पेहरन-ए-शरीफ’ उत्सवासाठी बाबूजीपुरा पंचमंडळीने पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना अधिकृत निवेदन सादर केले असून, मिरवणूक विना वाद्य काढण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे उत्सव शांततेत पार पडावा आणि नागरिकांच्या धार्मिक भावना जपल्या जाव्यात, हा उद्देश ठेवण्यात आला आहे.

या पारंपरिक उत्सवाची मुळे शतकाहून अधिक काळापासून घट्ट रुतलेली असून, दरवर्षी हा उत्सव मुस्लिम समाजबांधव मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. विशेष म्हणजे या उत्सवात केवळ मुस्लिमच नव्हे तर हिंदू बांधवही सहभाग घेत असल्याने तो हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून गौरवले जातो. सामाजिक सलोखा, परस्पर सन्मान आणि बंधुभाव यांचे दर्शन घडवणाऱ्या या उत्सवामुळे यावल शहरात धार्मिक सौहार्द टिकून आहे.

या वर्षीच्या आयोजनासाठी ‘बाबूजीपुरा पेहरन-ए-शरीफ समिती’ स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष शेख नईम शेख शरीफ असून, उपाध्यक्ष म्हणून मोहसीनखान गफुरखान, सहसचिव शहीर खान शब्बीर खान, खजिनदार नसिरुद्दीन शहाबुद्दीन कार्यरत आहेत. याशिवाय समितीत शेख हबीब गुलाम रसूल, इरफानखान अलियारखान, मेहमूदखान, रियाजोद्दीन शेख सलीम, रिजवान शेख कुतुबोद्दीन, मुस्तफा खान मेहबूब खान, सय्यद फिरोज सय्यद अहमद, मोसिन खान मुसीर खान, शेख अखलाक शेख खलील, गुलाम गौस शेख नबी, निसरोद्यीन अमीरोद्यीन, नईम युनूस खाटीक, वसीमखान नासीरखान, अन्सारोद्यीन इसरारोद्यीन, अरब मसुद सईद यांचा समावेश आहे. समितीच्या संयुक्त प्रयत्नांतून उत्सव शिस्तबद्ध आणि भक्तिपूर्वक पार पडणार आहे.


Protected Content

Play sound