जळगाव प्रतिनिधी । गिरणा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर तालुका पोलीसांनी पकडले असून ट्रॅक्टर चालकावर जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखाल करण्यात आला आहे. ,
वाहनचालक समाधान धुडकू सपकाळे रा. कडगाव ता. भुसावळ याच्यासह वाहन मालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानळदा शिवारातील फुपनगरी फाट्याकडून (एम.एच.१९ बी.एम. ४४४३) या क्रमांकाच्या टीप्परमधुन विना परवाना गिरणा नदीपात्रातून वाळुची चोरटी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार तालुका पोलिसांच्या पथकाने शनिवारी फुफनगरी फाट्यावर सापळा लावून वाळूची चोरटी वाहतूक करणारे वाहन पकडले. दोन ब्रास वाळूसह वाहन पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विकास पहूरकर यांच्या फिर्यादीवरून वाहनावरील चालक समाधान धुडकू सपकाळे यांच्यासह वाहनाच्या मालकाविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सायकर करीत आहे.