अवैध वाळू वाहतूक करणारे टॅक्टर ट्रॉली जप्त; रावेर तहसीलदारांची कारवाई

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सुकी नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करीत असलेल्या एका टॅक्टर ट्रॉलीला तहसिलदार बंडू कापसे यांनी जप्त केले आहे, ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सकाळच्या पहाटे तहसीलदारांनी मोटरसायकलने जाऊन ही कारवाई केली आहे.

महसूल प्रशासन निवडणुकीच्या काळात प्रचंड व्यस्त असल्याचा फायदा घेऊन वाळू माफिया सैराट सुटले होते. परंतु आज सकाळी तहसीलदार कापसे यांनी आपल्या टीमसह चिनावल येथील सुकी नदी पात्रात अवैध वाळू वाहतूक करीत असलेला विना नंबर प्लेटचा टॅक्टर ट्रॉली जप्त केला. त्यांनी स्वतः त्यावर बसून टॅक्टर ट्रॉली रावेर तहसील कार्यालयात आणली. त्यांच्या धाडसी कारवाईची सर्वत्र चर्चा होत आहे. या कारवाईत स्वप्निल परदेशी तलाठी रावेर, गोपाळ भगत तलाठी खानापूर, गुणवंत बरेला तलाठी लोहारा, निलेश चौधरी तलाठी उटखेडा इत्यादी महसूल कर्मचारी सहभागी होते.

Protected Content